समाजविकास करण्यासाठी शिवसेना नावच वादळ
महाराष्ट्रात निर्माण झाले होते. समाजविकास करत असताना सत्तेची अपरिहार्ता असावी
लागते. त्यामुळे शिवसेनेची वाटचाल हि समाजकारण ते राजकारण असी झालेली दिसून
येते. समाज्यातील अपुर्या सेवा सुविधा, बेरोजगार, प्रशासनाची अकार्यक्षमता, भ्रष्ठाचार, मराठी
मनाचा स्वाभिमान या मुद्द्याबाबत सेनेने विविध प्रकारची आंदोलने (दादागिरी) केली
आहेत. मराठीचा मुद्दा उपस्थित करून सेनेने मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकवला.
त्यानंतर सेनेने महाराष्ट्रावर सत्ता स्थापन केली. मराठी माणसांवरती होणाऱ्या
अन्यायास न्यास देणारा पक्ष म्हणून सेनेने आपले प्राबल्य महाराष्ट्रात निर्माण
केले. या मार्गासाठी त्यांनी "आक्रमकता" हाच पर्याय बहुदा निवडलेला
दिसून येतो. त्याचेत प्रतिबिंब दिल्ली स्थित "महाराष्ट्र सदन"
कारभारवर/सेवा सुविधाबाबत दिसून आहे. महाराष्ट्र सदनात खासदारांना मिळणारे खाद्यपदार्थ/ जेवण हे निकृष्ठ आहे, म्हणून व्यवस्थापक/कामगार यांना दादागिरीचा धाक
दाखवत 'सेनेच्या
कार्यपद्धीचे' दर्शन
घडवले.
शिवसेनेच्या खासदारांनी आपल्याला मिळणाऱ्या
सेवा - सुविधा बाबत आवाज उठवला.परंतु याच सेनापक्षाने मुंबईत नागरिकांना किती सेवा
सुविधा दिल्या ? विविध
प्रश्नाबाबत किती तत्परता दाखवली ? अत्यावशक सेवा वेळेवर नागरिकांना मिळतात का ? प्रशासन
कार्यक्षम आहे का ? यासारख्या प्रश्नाबाबत व त्यावरील उपायाबाबत
त्यांनी तत्परता दाखवली नाही. आजही मुंबईसाठी सेना पक्के रस्ते देवू शकली नाही.
मुंबई मधील रस्ते
पिरीपूर्ण नाहीत. जागोजागी खड्डे पडले आहेत. परवा तर या खड्यामुळे शाळकरी मुलाचा
मृत्यू झाला. लोटस पार्क मधील लागलेली आग अधिकार्यांचा अकार्यक्षमतेमुळे लागलेली होती.
परंतु सेनेने त्याबाबत काहीही भूमिका घेतली नाही. एकंदरीत सामान्य नागरिकांना
भेडसावणाऱ्या समस्याबाबत सेनेचा आवाज मंदावला आहे..तर स्वतःसाठी मिळणाऱ्या सुवेधेत
चढ-उतार झाल्यास सेनेचा आवाज वाढतो. त्यामुळे सेनेने सर्वसामान्य नागरिकांना
मिळणाऱ्या सुवेधेबाबत आधी लक्ष द्यावे; नाहीतर सेनेची डरकाळी त्यांच्यासाठीच भीतीदायक
ठरेल..
No comments:
Post a Comment