19 July 2015

सेवावृत्त पारदर्शकतेचे

                                       

         काही दशकापूर्वी प्रत्येक आई-वडिलांचे एक स्वप्न होते कीआपला मुलगा/मुलगी यांनी खुप शिकावे. उच्य शिक्षण घ्यावे. शिकून एखादा मोठा “ साहेब” होऊन गोरगरिबांची सेवा  करावी. जनतेच्या कल्यानाचे निर्णय घ्यावेत. समाजाचा विकास करण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय निधड्या छातीने घ्यावेत. त्यांनी व्यवहार करताना पारदर्शकपणे व्यवहार करावा..जनतेचे कल्याण करणे हेच त्यांचे परम कर्तव्य असावे. या सर्व चारित्र्याची शिकवन   प्रत्येक आई- वडील आपल्या वर्तवणूकीतुन देत असत. त्यामुळे प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्या आई/वडिलांची इच्छा पुर्ण करण्यासाठी धडपडीत असे.
काळ बदललापरिस्थितीत अमुलाग्र बदल घडून आले. मानवी गरजामध्ये बदलत गेल्या. चंगळवादी वृत्ती वाढीस लागली. सुख-सोईत वाढ झाली. त्यामुळे मानवाच्या "सुखी जीवनाच्या” संकल्पना बदलल्या. याचा थेट परिणाम घडून आला तो मानवी व्यवहारावर. काही दशकापूर्वी ची पालकांची आपल्या आपत्याकडून असणारी अपेक्षा बदलली.
आपल्या मुलाने किंवा मुलीने खूप मोठे साहेब व्हावे. कारण त्यातून गरजेपेक्षा जास्त पैसा वाम मार्गाने  प्राप्त करता येतो. समाजाच्या कल्यानापेक्षा कुटूंबाचे कल्याण सर्वात आधी प्राप्त करता येते. विविध शहरात मोठमोठाले बंगले घेता येतात. जमीन जुमला विकत घेता येतो. अशा प्रकारच्या इच्छा पालकच आपल्या आपत्यांना बोलून दाखवतातअशा घटना किंवा प्रसंग पाहिल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर  अंतकरणाला खूप वेदना होतात. अशा व्यक्तींचा खूप तिरस्कार वाटायला लागतो.

23 May 2015

अच्छे दिन होंगे ...

                                                         
चालू व पुढील आठवड्याचा प्रत्येक दिवसाची सुरुवात व शेवट हा "नरेंद्र मोदी व एक वर्ष", "अच्छे दिन और भाजप सरकार", "भाजप सरकार: एका वर्षाचा पंचनामा" यासारख्या विषयांनी होतो. माध्यमे व जनता  यांच्यात फक्त याच विषयावर चर्चा सतत चालू असते. किंबहुना फक्त या विषयावरील  चर्चा करणेही परिवर्तनाची व उत्कांतीची मुख्य धार असल्याचे भासवले जात आहे. भाजप सरकारने एका वर्षात हे केले नाही. ते केले नाही. सरकार कोणाचे आहेअच्छे दिन कब आयेंगे ? कब आनेवाले है ? या विषयांना धरून सतत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
भारताचा विकास हा फक्त आणि फक्त भाजप सरकारनेच केला पाहिजेअशी वेडी  आशा प्रत्येक जण बाळगून आहे. त्यामूळे माध्यमे व काही तत्वज्ञानी लोक वरील विषयावर आपले मत मांडत असलेले पहावयास मिळते. परंतु सर्वजण हे विसरतात कीसामाजिक सुधारणा करणे,नवीन  योजना व धोरण निर्माण करणेत्याची अंमलबजावणी करणेनवीन संकल्पनांचा अवलंब करणेहे कार्य फक्त सरकारचेच कार्य आहे. त्यामध्ये विरोधी पक्ष व इतर अन्य पक्षसर्वसामान्य जनता,  माध्यमे व संस्था - संघटना यांची भूमिका महत्वाची नाही का ? आज विरोधी पक्षाची भूमिका व विचारधारासर्वसामान्य जनतेचा सहभागमाध्यमांचे कार्य व पारदर्शीपणायाबाबत कधीच कोणी कसे काय बोलत नाही..याबाबत कोणत्या माध्यमांनी चर्चा घडवून आणलीत्याप्रकारचे सर्वे कधी का केले जात नाहीत. प्रशासकिय नोकरशाहीची कार्यक्षमता ? याचे मोजमाप का कधी केले जात नाही...फक्त आणि फक्त सरकार ..सरकार आणि सरकार. जर खऱ्या अर्थाने बदल घडवून आणायचे असतील तर सरकार बरोबर जनतामाध्यमेप्रशासकीय नोकरशाही,  संस्था - संघटनाविरोधी पक्ष या सर्वांच्या कार्याचे मुल्यमापन होणे गरजेचे आहे. मग सरकार कोणाचेही असो. अच्छे दिन आयेंगे नही ? अच्छे दिन होंगे...

आत्मिक आनंद

लोकप्रभा हे माझ्या अत्यंत आवडीचे साप्ताहिक. ते दर शुक्रवारी नियमित प्रकाशित होते. परीक्षा संपल्यामुळे मी आज गावी चाललो होतो. त्यामुळे लोकप्रभाचा नुकताच प्रकाशीत झालेला रूचकर विशेषांक खरेदी करण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरील बुक स्टाॅल मध्ये गेलो. परंतू मला त्या ठिकाणी तो विशेषांक मिळाला नाही. त्यावेळी खूपच नाराज झालो. (प्रवासात जर कोणाशी नजरानजर झाली नाहीतर विशेषांक वाचण्यात धन्यता मानायची)असो तर मी ठरवले कीपंढरपूर विठ्ठ्ल नगरीत जाता क्षणी लोकप्रभाचा विशेषांक खरेदी करायचा. दुपारी साडेचार च्या सुमारास मी पंढरपुरात पोहोचलो. पंढरपूर बस स्थानकातील बुक स्टाॅल मध्ये लोकप्रभाचा ताजा अंक मिळाला. लोकप्रभा अंकाची किंमत बारा रूपये होती. माझ्याकडे सुट्टे बारा रूपये नसल्यामुळे मी त्या दुकानदारास शंभर रूपयांची नोट काढून दिली व वरून दोन रुपयांचे नाणे दिले (ए.टी.एम कार्ड मुळे सूट्ट्या पैशांचा जाम प्रोबलेम झालेला आहे ). त्या दुकानदाराने लोकप्रभाचा अंक व  राहिलेले पैसे मला परत दिले. परंतू मी पैसे मोजून घेत असल्यामुळे दिलेले पैसे मोजले. पाहतो तर काय...त्या दुकानदारराने दहा रूपयांची एक नोट जास्त दिलेली होती. मी प्रामाणिकपणे ती दहा रुपयांची नोट दुकानदारास परत केली. त्याच वेळेस मला त्या दुकानदाराच्या चेहर्यावर एक वेगगळाच आनंद पहावयास मिळाला..तसेच मी केलेल्या कार्याचा माझी मलाच अभिमान वाटला. कार्य कितीही छोटे किंवा मोठे असले तरी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा आत्मिक आनंद काही वेगळाच असतो...

20 May 2015

बलशाही भारत

कोल्हापूर मधील एका हेअर कटिंग दुकानात कटिंग करण्यासाठी गेलो होतो. कटिंग करण्यासाठी खुर्चित बसताच क्षणी न्हाव्याने केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहिले आणि विचारले कीसाहेब..मला तंबाखूचे वेसन सोडावयाचे आहेउपाय सांगा की एखादा ? मला काय सांगावे तेच कळेना . त्याने अशा माणसाकडे उपाय मागितला व्होता  कीज्याने तंबाखू साधी मळलेली सुद्धा नव्हती. मी त्याला सांगितले कीआजच्या दिवशी तंबाखू खायची नाही. या  नियमाचे दररोज पालन करायचे. फक्त हा  एकच  निश्चय दररोज केला की व्यसन कायमचे सुटेलकाय माहीत त्याला हा उपाय योग्य वाटला. परंतू हा विषय येथेच संपत नाही. कारण आर्थिक परिस्थितीने कनिष्ठ ते मध्यम वर्गातील व्यक्ती आयुष्यभर जेवढे कामवते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पैसा व्यसनामुळे होणाऱ्या आजाराज्या उपचारावर खर्च करते. पण शेवटी आरोग्यपैसा व वेळ निघुन गेलेली असते. उरतो तो पश्चाताप . त्यामुळे शरीरास अपायकारक असणाऱ्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करायच्या आगोदर मनपूर्वक एकदाच विचार करावा. स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी. तेंव्हाच आरोग्यवान बलशाही भारत निर्माण होईल.