
नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत मांडला
गेला. या अर्थ्संकाल्पामध्ये संरक्षण
क्षेत्राच्या विकासासाठी परकीय गुंतवणुकीचा मार्ग अवलंबला आहे. त्याचे प्रमाण २६ % वरून थेट ४९ % एवढे करण्यात आहे आहे. याचाच अर्थ असा
कि, गतकालीन कालखंडामध्ये
कॉंगेस प्रणीत सरकारकडून संरक्षण क्षेत्रात भरीव व आश्वासक अशी कामगिरी घडून आली नाही. खरे तर मागील काही वर्षात संरक्षण
क्षेत्रात समाधान कारक वाढ घडून आली
नाहीच तर याउलट भारतीय सैनिकांचे / जवानांचे मनोधैर्य कमालीचे ढासळलेले दिसून येते. परकीय व देशांतर्गत होणार्या छुप्या
हल्ल्याने व बंडाळी ने शांतता व
सुरक्षेचे कवच कधीच भेदलेल आहे. वर्तमान काळात व भविष्य काळात परकीय देशाडून होणार्या सीमातर्गत हल्ल्यापेक्षा देशांतर्गत
होणारे छुपे हल्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय सीमा संरक्षणबरोबरच देशांतर्गत
संरक्षणाच्या सुविधेत सकारात्मक
बदल होणे गरजेचे आहे.
भारतातील सध्याचे राजकारण व समाजकारण हे विशिष्ठ लोकसमुदाय व विशिष्ठ वर्गापुरते सीमित होण्याच्या
मार्गावर आहे. त्यामुळे सामाज्याम्ध्ये
घडणार्या प्रत्येक घटनापासून स्वतःस काय फायदा होणार आहे, या संकुचित
वृतीने लोक त्याकडे पाहत आहेत. त्यातूनच राजकारणी लोक व भांडवलदार स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी सामाज्यामध्ये तेढ / तंटा निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. सामाज्यामध्ये
असणारी ऐक्याची व एकात्मतेचा
बंध सैल होत चाललेला आहे. एकमेकाबरोबरचे असणारे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे सबंधास छेद पडत आहे. याचाच फायदा राष्ट्रीय व
अंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या
दहशतवादी संघटना घेतात. त्यातूनच दहशतवादी हल्ल्यांच्या योजना तयार होतात. दुसरीकडे असे पहावयास मिळते की, भारतात नक्षलवादी / माओवादी संघटना अधिकच विस्तारित आहेत. भारतातील वाढती लोकसंख्या
सर्व तरुणांना रोजगार देऊ शकत
नाही. काम करणाऱ्या हाताना काम मिळाले नाही तर उपजीवेकेचे प्रश्न निर्माण होतात.
ज्या शासनप्रनालीमाद्ये / समाजव्यावास्थेमाद्ये पोटभर अन्न
मिळत नाही अश्या सामाज्यामध्ये
संघर्षाशिवाय पर्याय नसतो. तो संघर्ष हा विधायक मार्गाचा व विघातक मार्गाचा असतो.यापैकी कोणत्या मार्गाने आपला जलद
गतीने विकास घडून येईल या
विचारात असतानाच युवकांना विघातक मार्गाकडे वळण्यासाठी प्रवृत्त केले जाते. आपल्यावर कसा अन्याय होतो व त्यातून आपले हक्क कसे
हिरावून घेतले जातात (एका दृष्ठीने
योग्यच ), याबाबत त्यांना भडकावले जाते. त्याच्या मानासिकाचे वापर करून त्यांच्या हाती हत्यारे दिली जातात..त्यातूनच समाज्यात
घातपात घडवून आणला जातो. यातील महत्वाची बाब म्हणजे नक्षलवादी/माओवादी यांना
मिळणारी हत्यारे / दारुगोळा
काही घनदाट जंगलात तयार होत नाही. त्याच्याकडील हत्यारे व दारुगोळा विदेशी बनावटीचा असतो. म्हणजेच परदेशातून त्याचा पुरवठा केला जातो.एवढी
सुरक्षा असताना त्यांना हत्यारे कसी प्राप्त होतात ? म्हणजेच भारतातील संरक्षण व्यवस्था निकामी होत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीतच दोष आहे. ज्या
देशात कायद्याच्या व्यवस्थेत
पारदर्शकता नाही, ज्या देशात
जात-पात -धर्मावरून तेढ निर्माण केला जातो, एकता
व एकात्मता नास्थ होत चालली आहे, सैनिकांचे
मनोधर्य ढासळत आहे, सुरक्षा व्यवस्थेत खिळखिळी होत आहे अस्य देश्यात संरक्षण
क्षेत्रात केली जाणारी परकीय
गुंतवणूक काय करणार ?
भारतातील संरक्षण क्षेत्रात केल्या जाणार्या परकीय गुंतवणुकीमुळे एक फायदा नक्कीच होईल, तो म्हणजे जुनाट व पारंपारिक संरक्षण साधनात अत्याधुनिकता येईल. नवीन यंत्र व अवजारे यामुळे आपले
संरक्षण यंत्रणा जगाबरोबर
धावेल. शेजारील राष्ट्रावर नियंत्रण प्रस्थापित ठेवता येईल. काही अंशी होणार्या हल्ल्यावर नियंत्रण ठेवता येईल.त्यामुळे समाज्यात शांतता व
सुरक्षातता पुन्हा नव्याने निर्माण
होईल. या सर्व उपायाबरोबर भारतीय समाज एकसंघ व एकनिष्ठ ठेवल्यास संरक्षणाचे कवच अधिकच मजबूत होईल. हीच आपली सर्वात मोठी
स्वदेशी / स्वकीय संरक्षित
गुंतुवणूक ठरेल.....