लोकसभा
निवडणुका ज्या प्रकारे जवळ-जवळ येत आहेत त्या प्रकारे आरोप प्रत्यारोपाची उधळण
सर्वच राजकीय पक्षाकडून केली जात आहे. परतू राजकीय पक्षाकडून केले जाणारे आरोप / टीका
हि भूतकाळात घडून गेलेल्या घटनापुर्तीच सीमित असलेले दिसून येते. कॉंग्रेस
पक्षाकडून केले जाणारे आरोप हे बाबरी मशीद प्रकरण, गुजरात
दंगल, १९९२ मुंबई बॉम्बस्फोट तर भाजपचे १९७५ ची राष्ट्रीय आणीबाणी, १९८४
शीख दंगल , बोफार्स प्रकरण, १९९१ च्या आर्थिक सुधारणा यापुरतेच मर्यादित असलेले दिसून येते.
भूतकाळात घडलेल्या या सर्व घटनाचा वर्तमानकालीन परिस्थितीशी काहीही संबंध नाही.
कारण प्रत्येक पक्षाने घेतलेला निर्णय हा परिस्थिती सापेक्ष होता. परंतु संपूर्ण
भारतीयाचे दुर्देव असे कि, प्रत्येक राजकीय पक्ष हा
भूतकालीन घटनावर निवडणुकीस सामोरे जात आहे. सध्या राष्ट्रीय सुरक्षा, प्रसानानातील प्रामाणिकपणा, महिला
सुरक्षा, परराष्ट्र धोरण, परकीय व्यापार, अर्थनीती धोरण, सर्वसमावेशक आर्थिक विकास, प्रादेशिक
समतोलपणा, उर्जा धोरण, परराष्ट्र संबंध, शेती विकास, माहिती तंत्रज्ञान धोरण यासारखे प्रश्न उभे आहेत. परंतु त्याच्या
बाबतीत कोणत्याही राजकीय पक्षाकडून नोंद घेतली जात नाही. त्याबाबतीत त्यांचे ठोस
असे धोरण/निर्णय नाहीत. स्वतंत्र प्राप्तीच्या ६८ वर्षानंतर हि रस्ते,वीज आणि पाणी हे प्रश्न आपण सोडवू शकलो नाही. प्रत्येक राजकीय
पक्षाच्या जाहीरनाम्यात या तीन बाबींना अग्रस्थान दिले जाते. देशाची वर्तमानकालीन
स्थिती व भविष्यकालीन अडचणी यावर कोठेच विचार मंथन होथाना दिसून येत नाही.
त्यामुळे स्वतःला प्रगतीचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्या राजकीय पक्षांना विकासाचा व
आत्मसन्मान निर्माण करणाऱ्या धोरणांचा 'शहाणपण' कधी येणार....
No comments:
Post a Comment