22 January 2014

श्रीमंतांची 'श्रीमंती'


गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढल्यामुळे फक्त ८५ श्रीमंतांकडे जगाची अर्धी संपत्ती आली आहे, अशी आकडेवारी जागतिक आर्थिक परिषदेत मांडण्यात आली. परिषदेच्या सुरुवातीला ऑक्सफॅमचा 'वर्किंग फॉर द फ्यू' हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी वाढत असल्याचे आकडेवारीसह मांडण्यात आले आहे.
अर्थशास्त्राच्या दृष्ठीकोनातून विचार करता असे दिसून  येते की, विकासच्या कोणत्याही टप्प्यामध्ये सामाज्यामध्ये व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीत चढ-उतार असतात..कारण आर्थिक प्राप्ती करण्यासाठी आवश्यक असणारी संधी व अनुकूल परस्थिती सर्वाना लाभत नसते.तसेच प्रत्येक टप्प्यामध्ये असणारी स्पर्धा आर्थिक मिळकतीचे गणित बदलत टाकणारी असते.त्यामुळे सामाज्याम्ध्ये एक प्रकारची आर्थिक विषमता असलेली दिसते..परंतु आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'वर्किंग फॉर द फ्यू'अहवालाचा विचार करता ,सामाज्यामध्ये असणारी आर्थिक विषमतेतील दरी भूमितीय सूत्राने वाढत आहे. गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी अधिक खोल होत आहे.
आधुनिक अर्थशास्त्राचा जनक अडम स्मिथ (Adam Smith) म्हणतो की,मनुष्य हा निसर्गतः स्वार्थी असतो .त्यामुळे प्रत्येक मनुष्य आपला आर्थिक विकास साध्य करताना स्वार्थी दृष्टीकोनातून करीत असतो..परंतु आधुनिक काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे असे म्हटले जाते.त्यामुळे तंत्रज्ञानाची साधने /सामग्री ज्यांच्या हातात असतात तोच वर्ग आर्थिक दृष्ट्या साधन होतो. कारण जगाबरोबर स्पर्धा करावयाची असल्यास तंत्रज्ञानाचा/यंत्रसामग्रीचा वापर करणे अपरिहार्य ठरते. हि साधने प्राप्त करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे संपतीचा ओघ हा गरीबाकडून/मध्यमवर्गाकडून श्रीमंत वर्गाकडे हस्तांतर करीत असतो. त्यामुळे आर्थिक संपत्तीचे केंद्रीकरण एका विशिष्ठ वर्गाच्या अधिपत्याखाली होते. हाच वर्ग भांडवल दार वर्ग म्हणून ओळखला जातो.
सध्याच्या काळात अस्तित्त्वात असलेया 'बौद्धिक संपदा अधिकारा'मुळे एखाद्या उद्योगाने /व्यक्तीने लावलेला तांत्रिक शोध हा त्याच्या मालकीचा होतो. त्याच्या कायदेशीर परवानगीशिवाय त्याचा इतरांना वापस करण्यास मनाई असते. त्यामुळे त्याचे भांडवल करून व्यक्ती/संस्था प्रचंड प्रमाणात श्रीमंत होतात. तर त्यापुढील तंत्रज्ञान विकासासाठी बरुव आर्थिक तरतुदी करताना दिसून येते. जगातील श्रीमंत असणाऱ्या वर्गाचा विचार करता असे दिसून येते की यातील बहुतांश व्यक्ती या तंत्रज्ञानाशी/यांत्रासामाग्री उद्योगाशी निगडीत आहेत. त्यामुळे एकप्रकारे श्रीमंत हा अधिकच श्रीमंत होत चालला आहे तर गरीब हा गरीब होत चालला आहे. ज्यावेळी आर्थिक विषमतेची दरी एका विशिष्ठ पातळीपर्यंत वाढली असता गरीब लोक उठाव करतील व भांडवलशाही संपुष्टात येईल. कार्ल मार्क्स च्या लेखणामुळे रशियामध्ये रक्तरणजीत क्रांती झाली तेव्हा भांडवलशाहीहा तडे जावून समाज्यात साम्यवाद उदयास आला. त्याची पुनरावृत्ती येत्या काळात घडून येईल. कारण आर्थिक विषमतेची दरी कमी न होता ती अधिकच वाढत जाणार आहे.
आजच्या काळामध्ये वाढत जाणारी आर्थिक विषमता नष्ट करावयाची असल्यास महात्मा गांधी यांनी मांडलेली  'विश्वस्त समाज' या संकल्पनेशियाय पर्याय नाही..प्रत्येकाने स्वतःस आवश्यक असणारी संपत्तीचा वापर करावा व शिल्लक असणाऱ्या संपत्तीचा एक सामाज्याचा विश्वस्त म्हणून तिचा वापर करावा..त्यामुळे प्रत्येकाला आवश्यक असणाऱ्या गराजाची पूर्तता करता येणे शक्य होईल .त्यामुळे कार्ल मार्क्सच्या स्वप्नातील वर्गविरहित समाज व गांधीजींना अभिप्रीत असणारा एकसंध समाज निर्माण होईल..हाच समाजविकासाचा पाया ठरणार आहे......


No comments:

Post a Comment