18 January 2014

डबल बेल


संध्याकाळची वेळ होती. घरट्याबाहेर पडलेले पक्षी त्याप्रकारे आपल्या घरट्याकडे झेपावतात त्याचप्रकारे शहरी भागातील नोकरदार, कामगार, व्यावसाईक, मजूर व प्रवाशी आदीजण आपापल्या घरट्याकडे परतण्यासाठी धरपडत असतो. प्रत्येकाची एकच धावपळ उडालेली असते. प्रत्येकजण इतरांचा विचार न करता स्वतःच्या ध्येयाने निघालेला असतो. प्रत्येकाच्या वाटा भिन्न भिन्न असतात. शहरी संस्कृतीचा गाब्यात दडलेले हे एक गूढ कोडे आहे व प्रत्येकजण त्यामध्ये अडकलेला असतो.
मी ही या धावपळीच्या व स्पर्धात्मक जीवनाचा घटक बनलो हे कळालेच नाही.अशाच एका संध्याकाळी या जीवनाचा प्रवास करताना एक विचारी व जीवनास उभारी देणारा प्रसंगाचा साक्षीदार बनलो. शहरातील जवळ-जवळ सर्वच मध्यमवर्ग रेल्वेने किंवा बसने प्रवास करतात. एकदा बसची वाट पाहत मी एका बसथांब्यावर उभा होतो.बसथांब्याला गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा परिस्थितीत एकही बस थांबत नव्हती.येणारी प्रत्येक बस तुडुंब गर्दीने भरून येत होती. थोड्या वेळाने एक बस आमच्या बसथांब्यावर येवून थांबली.सर्वांची एकच धावपळ उडाली. मी कसाबसी बसच्या दारात जागा मिळवली.श्वास घेण्यासाठी प्रत्येकाची धरपड चालू होती. हाच धक्याबुक्याचा काळ जीवनाचे तत्वज्ञान सांगून गेला.
बसमध्ये लोकांच्या आसुसलेल्या नजरा, चेहऱ्यावरील दडपण, आनंदाचे चेहरे पहावयास मिळाले. याच गर्दीमध्ये शीटवरती जागा नसतानाही जागा मागणारे तापट व क्रोधी लोक दिसले. या गर्दीमध्ये आपल्या गोंडस मुलाला कडेवर्ती घेतलेली एक स्त्री उभा होती तर तिचा नवरा तिच्या शेजारी निवांत उभा होता. खुप वेळ झालातरी ती तशाच अवघडलेल्या स्थितीत उभा होती. परंतु याच गर्दीत अचानक पणे लक्ष्य वेधून घेतले ते बसच्या वाहक असणाऱ्या स्त्रीने. साधारणतहा: सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची वाहक असणारी स्त्री प्रवाश्यांच्या गर्दीत आपले तिकीट काढणीचे कर्तव्य कुशलतेने पार पाडत होती. परंतु तिच्या वागण्या बोलण्यात आपुलकीची भावना होती. बसचे आलेले थांबे पाहून बस थांबवणे, नवीन प्रवासी बसमध्ये चढले की बस सुरु करण्यास बेल वाजवण्यापासून येणाऱ्या बसथांब्याची माहिती देण्याबरोबरच वयोवृद्ध नागरिकांना बसमधून उतरण्यास मदत करीत होती. तिच्या संपूर्ण वागवणूकीचा परिणाम म्हणजे तिच्याशी कोणीही सुट्टे पैश्यावरून भांडत नव्हते कि तिला उलट बोलत नसे. दिवसभर प्रवाशांशी हुज्जत घालताना, त्यांची समजूत घालताना होणारी दमछाक तिच्या नशिबी कधीही आली नसावी. एक संपूर्ण व निखळ हसते व्यक्तिमत्व, सहानभूती तसेच प्रामाणिक, आपुलकीचा भाव असणारी आदर्श बसवाहक महिला कायमस्वरूपी ध्यानी राहिली.          


No comments:

Post a Comment