चालू व पुढील आठवड्याचा प्रत्येक दिवसाची सुरुवात व शेवट हा "नरेंद्र मोदी व एक वर्ष", "अच्छे दिन और भाजप सरकार", "भाजप सरकार: एका वर्षाचा पंचनामा" यासारख्या विषयांनी
होतो. माध्यमे व जनता यांच्यात
फक्त याच विषयावर चर्चा सतत चालू असते. किंबहुना फक्त या विषयावरील चर्चा करणे, ही परिवर्तनाची व उत्कांतीची मुख्य धार असल्याचे भासवले जात
आहे. भाजप सरकारने एका वर्षात हे केले नाही. ते केले नाही. सरकार कोणाचे आहे? अच्छे दिन कब
आयेंगे ? कब आनेवाले है ? या विषयांना धरून सतत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
भारताचा विकास हा फक्त आणि फक्त भाजप सरकारनेच केला पाहिजे, अशी वेडी आशा प्रत्येक जण बाळगून आहे. त्यामूळे माध्यमे व काही
तत्वज्ञानी लोक वरील विषयावर आपले मत मांडत असलेले पहावयास मिळते. परंतु सर्वजण हे
विसरतात की, सामाजिक
सुधारणा करणे,नवीन योजना व धोरण निर्माण करणे, त्याची अंमलबजावणी करणे, नवीन संकल्पनांचा अवलंब करणे, हे कार्य फक्त सरकारचेच कार्य आहे. त्यामध्ये विरोधी पक्ष व
इतर अन्य पक्ष, सर्वसामान्य
जनता, माध्यमे व संस्था - संघटना यांची भूमिका महत्वाची नाही का ? आज विरोधी पक्षाची भूमिका व विचारधारा, सर्वसामान्य जनतेचा सहभाग, माध्यमांचे कार्य व पारदर्शीपणा, याबाबत कधीच कोणी कसे काय बोलत नाही..याबाबत कोणत्या
माध्यमांनी चर्चा घडवून आणली? त्याप्रकारचे सर्वे कधी का केले जात नाहीत. प्रशासकिय
नोकरशाहीची कार्यक्षमता ? याचे मोजमाप का कधी केले जात नाही...फक्त आणि फक्त सरकार
..सरकार आणि सरकार. जर खऱ्या अर्थाने बदल घडवून आणायचे असतील तर सरकार बरोबर
जनता, माध्यमे, प्रशासकीय
नोकरशाही, संस्था - संघटना, विरोधी पक्ष या सर्वांच्या कार्याचे मुल्यमापन होणे गरजेचे
आहे. मग सरकार कोणाचेही असो. अच्छे
दिन आयेंगे नही ? अच्छे दिन होंगे...
No comments:
Post a Comment