23 May 2015

आत्मिक आनंद

लोकप्रभा हे माझ्या अत्यंत आवडीचे साप्ताहिक. ते दर शुक्रवारी नियमित प्रकाशित होते. परीक्षा संपल्यामुळे मी आज गावी चाललो होतो. त्यामुळे लोकप्रभाचा नुकताच प्रकाशीत झालेला रूचकर विशेषांक खरेदी करण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरील बुक स्टाॅल मध्ये गेलो. परंतू मला त्या ठिकाणी तो विशेषांक मिळाला नाही. त्यावेळी खूपच नाराज झालो. (प्रवासात जर कोणाशी नजरानजर झाली नाहीतर विशेषांक वाचण्यात धन्यता मानायची)असो तर मी ठरवले कीपंढरपूर विठ्ठ्ल नगरीत जाता क्षणी लोकप्रभाचा विशेषांक खरेदी करायचा. दुपारी साडेचार च्या सुमारास मी पंढरपुरात पोहोचलो. पंढरपूर बस स्थानकातील बुक स्टाॅल मध्ये लोकप्रभाचा ताजा अंक मिळाला. लोकप्रभा अंकाची किंमत बारा रूपये होती. माझ्याकडे सुट्टे बारा रूपये नसल्यामुळे मी त्या दुकानदारास शंभर रूपयांची नोट काढून दिली व वरून दोन रुपयांचे नाणे दिले (ए.टी.एम कार्ड मुळे सूट्ट्या पैशांचा जाम प्रोबलेम झालेला आहे ). त्या दुकानदाराने लोकप्रभाचा अंक व  राहिलेले पैसे मला परत दिले. परंतू मी पैसे मोजून घेत असल्यामुळे दिलेले पैसे मोजले. पाहतो तर काय...त्या दुकानदारराने दहा रूपयांची एक नोट जास्त दिलेली होती. मी प्रामाणिकपणे ती दहा रुपयांची नोट दुकानदारास परत केली. त्याच वेळेस मला त्या दुकानदाराच्या चेहर्यावर एक वेगगळाच आनंद पहावयास मिळाला..तसेच मी केलेल्या कार्याचा माझी मलाच अभिमान वाटला. कार्य कितीही छोटे किंवा मोठे असले तरी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा आत्मिक आनंद काही वेगळाच असतो...

No comments:

Post a Comment