कोल्हापूर मधील एका हेअर कटिंग दुकानात कटिंग करण्यासाठी गेलो होतो.
कटिंग करण्यासाठी खुर्चित बसताच क्षणी न्हाव्याने केविलवाण्या नजरेने माझ्याकडे
पाहिले आणि विचारले की, साहेब..मला
तंबाखूचे वेसन सोडावयाचे आहे, उपाय सांगा की एखादा ? मला काय सांगावे तेच कळेना . त्याने अशा माणसाकडे उपाय मागितला व्होता की, ज्याने तंबाखू साधी मळलेली सुद्धा
नव्हती. मी त्याला सांगितले की, आजच्या दिवशी तंबाखू
खायची नाही. या नियमाचे दररोज पालन करायचे.
फक्त हा एकच निश्चय दररोज केला की व्यसन कायमचे सुटेल. काय माहीत त्याला हा उपाय योग्य वाटला. परंतू हा विषय येथेच संपत नाही.
कारण आर्थिक परिस्थितीने कनिष्ठ ते मध्यम वर्गातील व्यक्ती आयुष्यभर जेवढे कामवते
त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पैसा व्यसनामुळे होणाऱ्या आजाराज्या उपचारावर खर्च
करते. पण शेवटी आरोग्य, पैसा व वेळ निघुन गेलेली
असते. उरतो तो पश्चाताप . त्यामुळे शरीरास अपायकारक असणाऱ्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करायच्या
आगोदर मनपूर्वक एकदाच विचार करावा. स्वत:साठी आणि
आपल्या कुटुंबासाठी. तेंव्हाच आरोग्यवान बलशाही भारत निर्माण होईल.
No comments:
Post a Comment