शिक्षणामुळे व्यक्ती विवेकी, बुद्धिमान, वैचारिक बनते. त्यामुळे व्यक्ती
वैयक्तिक हित साध्येतेबरोबरच सामाजिक हित साध्यातेला महत्व देतो. आपल्या बुद्धीच्या
जोरावर इतरांना सुखी,समाधानी,ठेवण्यासाठी सतत धडपड करत असतो. भारताच्या संदर्भात विचार
केला असता सामाजिक जीवनात अमुलाग्र बदल व सुधारणा घडवून आणण्यात शिक्षणाला
अन्यान्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक राष्ट्राचा सर्वांगीण
विकास हा त्या राष्ट्रातील शिक्षणाच्या दर्ज्यावर अवलंबून असतो. राष्ट्रातील
अनुकूल परिवर्तने हि शिक्षणाच्या विस्तार आणि विकासावर्ती आधारलेले असतात.
त्यामुळे प्रत्येक राष्ट्र शिक्षांच्या विकासासाठी व विस्तरासाठी विविध मार्गांचा
अवलंब करीत असते. प्रत्येक
भारताचा विचार केला असता असे
लक्ष्यात येते कि,स्वातंत्र्यानंतर कालखंडात शिक्षणाच्या प्रसारात वाढ घडून आली. त्यामुळे साक्षरतेच्या
वाढीबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणणे शक्य झाले. शिक्षणाबरोबरच संशोधनाचे
क्षेत्र विस्तारित गेले. त्यामुळे नव-नवीन तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत
गेला. भारताचे आंतराष्ट्रीय स्तरावरील स्थान मजबूत झाले. तसेच जागतिक स्तरावरील
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संशोधनाला चालना देणे अत्यावशक असण्याची जाणीव
झाली.यातूनच नवनवीन योजनांच्या मार्गाने संशोधनाच्या विकासासाठी आर्थिक तरतुदी
करण्यात आल्या.त्यामुळे सद्यस्थितीत भारताने संशोधन क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी
केही आहे. परुंतु संशोधन क्षेत्रातील टक्केवारी वाढत असली तरी संशोधनाचा दर्जा
खालावत चाललेला आहे. संशोधांची सुरुवात हि उच्य शिक्षणानंतर चालू होत असलेली दिसून
येते. परंतु आज भारतातील नामांकित गणल्या जाणाऱ्या विद्यापीठात संशोधन क्षेत्रात
भ्रष्ट्राचार होत असलेल्या घटना आढळून आलेल्या आहेत. तर काही ठिकाणी पैश्याच्या
बळावर विध्यार्थ्यांना संशोधनाबद्दल पी.एचडी व एम.फील पदव्या दिल्या जात आहेत.
याचबरोबर संशोधन प्रवेश प्रणालीतील गैरप्रकार आ वासून उभा आहे. विद्यापिठीय संशोधनाच्या
प्रवेश प्रणालीमध्ये वरील गैरप्रकार आढळून येतात (अपवाद मात्र असू शकतात).
विद्यापिठीय संशोधन प्रणाली द्वारे
संशोधकाची निवड करताना त्याचे विषयातील ज्ञान व अभिरुची विचारात न घेता संशोधकाचे
आर्थिक,राजकीय,सामाजिक संबंधाला ज्यास्त महत्व
दिले जात आहे.(जरी प्रवेश परीक्षा असली तरी) याबाबतीत एक गमतीशीर प्रकार आठवला.
एका महादेव (नाव बदलून) नावाच्या विद्यार्थ्याला पी.एचडी. साठी प्रवेश मिळाला
नाही.त्यामुळे तो खूप नाराज झाला. पण त्याला आपली हि खंत लपवता आली नाही. त्याच्या
म्हणण्यानुसार, संशोधन प्रणालीच्या मुलाखत
प्रकारात कमी गुण देण्यात आले. त्यामुळे त्याला अंतिम यादीतही स्थान मिळाले नाही.
या सर्व प्रकारामध्ये विभागप्रमुखाचा हात होता. कारण तो विभागप्रमुखांच्या
मर्जीतील (जात, धर्म, सामाजिक स्थर) नव्हता, असे असे त्या विद्यार्थ्याचे मत
होते. या आधीच्या विभागप्रमुखांनी त्याच्या मर्जीतील विद्यर्थ्याना प्रवेश मिळावा
म्हणून प्रवेश प्रणालीमध्ये भ्रष्ट्राच्यारकेला होता. त्यामुळे चालू
विभागप्रमुखांनी आपल्या मर्जीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून कंबर कसली
होती. परंतु तो नाराज न होता आनंदाने म्हणाला कि, पुढील वर्षी मी नक्की प्रवेश
मिळवणार कारण माझ्या प्रवर्गातील शिक्षक हे विभागप्रमुख होणार आहेत.
संशोधनाच्या कार्यक्षेत्रातील वरील
प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून येतात. प्रत्येकजण आपण किती शुद्ध व उच्य
आचरणाचे आहोत, हेच दाखवण्याचा ढोंगी प्रयत्नात
असतो. त्यामुळे काही प्रमाणात का होईना संशोधनातील गुणात्मक दर्जा खालावत चाललेला
आहे. जगातील घडून आलेले सर्व भ्रष्ट्राच्यार हे उच्यशिक्षित लोकांनी केलेले आहेत.
त्यामुळे आज शिक्षणाने मानवाच्या विचारात,वागणुकीत बदल होतात यावर विश्वास
बसत नाही. शिक्षणामुळे समाज्यात विधायक बदल घडून येतात हे जरी खरे असले तरी
सद्यस्थितीतील शिक्षण व संसोधनाचा मार्ग हा बदलत चाललेला आहे.
No comments:
Post a Comment