
काही दशकापूर्वी प्रत्येक आई-वडिलांचे एक स्वप्न होते की, आपला मुलगा/मुलगी यांनी खुप शिकावे. उच्य शिक्षण घ्यावे. शिकून एखादा मोठा “ साहेब” होऊन गोरगरिबांची सेवा करावी. जनतेच्या कल्यानाचे निर्णय घ्यावेत. समाजाचा विकास करण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय निधड्या छातीने घ्यावेत. त्यांनी व्यवहार करताना पारदर्शकपणे व्यवहार करावा..जनतेचे कल्याण करणे हेच त्यांचे परम कर्तव्य असावे. या सर्व चारित्र्याची शिकवन प्रत्येक आई- वडील आपल्या वर्तवणूकीतुन देत असत. त्यामुळे प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्या आई/वडिलांची इच्छा पुर्ण करण्यासाठी धडपडीत असे.
काळ बदलला. परिस्थितीत अमुलाग्र बदल घडून आले. मानवी गरजामध्ये बदलत गेल्या. चंगळवादी
वृत्ती वाढीस लागली. सुख-सोईत वाढ झाली. त्यामुळे मानवाच्या "सुखी जीवनाच्या” संकल्पना बदलल्या.
याचा थेट परिणाम घडून आला तो मानवी व्यवहारावर. काही दशकापूर्वी ची पालकांची
आपल्या आपत्याकडून असणारी अपेक्षा बदलली.
आपल्या मुलाने किंवा मुलीने खूप मोठे साहेब
व्हावे. कारण त्यातून गरजेपेक्षा जास्त पैसा वाम मार्गाने प्राप्त करता येतो. समाजाच्या कल्यानापेक्षा कुटूंबाचे कल्याण सर्वात आधी
प्राप्त करता येते. विविध शहरात मोठमोठाले बंगले घेता येतात. जमीन जुमला विकत घेता
येतो. अशा प्रकारच्या इच्छा पालकच आपल्या आपत्यांना बोलून दाखवतात. अशा घटना
किंवा प्रसंग पाहिल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर अंतकरणाला खूप वेदना होतात. अशा व्यक्तींचा खूप
तिरस्कार वाटायला लागतो.